Episode 392 · स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum
पूर्वीचं पुणे का राहिलं नाही?
7 Apr 2026 · 41 min
Episode 392 · स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum
7 Apr 2026 · 41 min
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून अभिमानाने नाव घेतलं जातं ते पुणे गेल्या काही दशकांमध्ये झपाट्याने विस्तारले आहे. हे होत असताना येथील नागरी सुविधांचा विकास कायमच चर्चेत राहिलेला आहे. नगर नियोजनातील तज्ज्ञ अनिरुद्ध पावसकर यांनी पुणे महापालिकेचे शहर अभियंता म्हणून नुकतीच सूत्रे हाती घेतली आहेत. त्यांना याच विषयावर बोलतं केले आहे संतोष देशपांडे यांनी. पुण्याच्या विकासाची दिशा नक्की कशी आहे, गती कुठे मंदावली आहे, येथील नगर नियोजनातील अडचणी कोणत्या, त्यावर काय मार्ग काढला जात आहे इथपासून ते शहर अभियंता म्हणून आपले प्राधान्य कशाला असेल इथपर्यंत अनेक बाबींची उलगड अनिरुद्ध पावसकरांनी या थेट…
by Santosh Deshpande · Marathi · Arts & Books
A Marathi podcast about Audiobooks and books. Where every once in a while, we will be talking about everything that is Audiobooks. It will feature author interviews, voice artist interviews, book lovers and more. The podcast is powered by Storytel. स्टोरीटेल कट्टा आहे एक आगळं-वेगळं गप्पांचं ठिकाण. इथं रंगतात गप्पा पुस्तकांविषयी, ऑडिओबुक्स विषयी. इथं उलगडतं लेखक-कलाकारांचं अंतरंग...त्यांचं…
E395 · 28 Jun 2026 · 22 min
सध्या जगभरातील फुटबॉलप्रेमी FIFA वर्ल्ड कपच्या स्पर्धेत रमले आहेत. आता knock out राऊंड सुरू होतोय, तेव्हा चर्चा होतेय ती विजेतेपद कोणाला मिळणार याची. भारतीय लष्करात ब्रिगेडियर म्हणून सेवा बजावलेले सुमंत दशरथ हे स्वतः उत्तम फुटबॉलपटू म्हणूनही प्रसिद्ध आहेत. या खेळाचे चाहते म्हणून त्यांनी आजवरच्या सामन्यांचे विश्लेषण आणि काही अंदाज मांडले आहेत. त्याबाबत संतोष देशपांडे यांसोबत रंगलेल्या या स्टोरीटेल कट्ट्यावरच्या गप्पा तमाम फुटबॉलप्रेमींना नक्की आवडतील!
E394 · 14 Jun 2026 · 36 min
मराठी साहित्यातील एक अजरामर साहित्यकृती म्हणून 'श्रीमानयोगी' ओळखली जाते. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या अलौकिक व्यक्तिमत्त्वाचा सहजसुंदर वेध घेणारे सिद्धहस्त लेखक रणजित देसाई यांची ही कादंबरी आता 'स्टोरीटेल' वर श्राव्य स्वरुपात दाखल झाली आहे. त्यास ज्यांचा आवाज लाभला आहे, ते प्रसिद्ध अभिवाचन कलाकार अनिरुद्ध दडके यांच्या समवेत रंगलेल्या या विशेष पॉडकास्ट मधून हा सारा प्रवास तर पुढे येतोच शिवाय 'श्रीमानयोगी' मधून त्यांना घडलेले शिवरायांचे असामान्य दर्शनही घडते. श्रीमानयोगी ऐकण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा-…
E393 · 10 Jun 2026 · 20 min
कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच `एआय` अनेक क्षेत्रांमध्ये वेगाने बदल घडवते आहे. माहिती तंत्रज्ञान म्हणजेच आयटी क्षेत्रावर त्याचा सर्वात मोठा प्रभाव पडत असल्याचे चित्र आहे. त्यातून कित्येकांच्या नोकऱ्या जात आहेत, या क्षेत्रातील कंपन्यांमध्ये भरतीप्रक्रियाही मंदावली आहे. अशा परिस्थितीत, ज्यांनी आयटी मध्ये शिक्षण घेऊन आपले करिअर करायचे असे ठरविले आहे, अशांनी, विशेषतः विद्यार्थ्यांनी नेमके काय करावे याचा वेध घेण्यासाठी संतोष देशपांडे यांनी आयटी उद्योजक मनोज देशमुख यांना बोलते केले. एकूणच सध्या परिस्थिती काय आहे आणि त्यातून आपण काय शिकायला हवे याची उलगड या संवादातून होते. आयटी क्षेत्राचे आकर्षण…
E391 · 21 Mar 2026 · 27 min
इराण आणि अमेरिका-इस्त्रायलमध्ये युद्ध सुरु झाले आणि त्याच्या ज्वाला संपूर्ण आखाती देशांत धगधगत आहेत. हॉर्म्युझची सामुद्रधुनीत तणाव निर्माण झाल्याने जगभरातील तेल व गॅसच्या वितरणावर गंभीर परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर, आखाती देशांमध्ये असणाऱ्या तेलविहिरी, तेथील तेल काढण्याची प्रक्रिया, त्यातील तंत्रज्ञान अशा अनेक बाबींचे कुतुहल सर्वांना आहे. अस्सल पुणेकर असणारे शौनक गाडगीळ हे पेट्रोकेमिकल तंत्रज्ञ गेली अनेक वर्षे प्रत्यक्ष तेलविहिरींवर काम करतात. त्यांच्याशी संतोष देशपांडे यांनी साधलेल्या या संवादातून सर्वसामान्य जनांना आजवर अज्ञात अशा अनेक गोष्टी सहजपणे उलगडतात. जगाच्या भवितव्याची दिशा…
E390 · 13 Mar 2026 · 25 min
आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रत्येक देशाचे हेर कार्यरत असतात. त्यांच्या थरारक कथा चित्रपट, वेबसिरीज किंवा पुस्तकांच्या माध्यामातून आपल्यापर्यंत पोहोचतात, खिळवून ठेवतात. प्रत्यक्षात हेरगिरी अशीच होत असते का? त्यातून युद्धाचे डाव खेळले जातात का? असे प्रश्न मग सर्वसामान्य रसिकांना पडतात. अशीच एक थरारक हेरकथा storytel वर दाखल झाली आहे- समीर चक्रवर्ती ऑपरेशन बलुचिस्तान! तिचे लेखक आहेत प्रसिद्ध लेखक संजय सोनवणी, ज्यांनी स्वतः खासगी गुप्तहेर म्हणून काम केले आहे. सध्या आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर खुद्द संजय सोनवणी यांच्याशी संतोष देशपांडे यांनी साधलेल्या या संवादातून अनेक रंजक…
E389 · 12 Feb 2026 · 19 min
वाचनाचे प्रमाण कमी होते आहे, ही परिस्थिती आपल्याकडेच नव्हे तर जगभरात आहे. जगात नवी पिढी ऑडिओबुक्सकडे का वळते आहे? भारतात काय परिस्थिती आहे? 2026 मध्ये वाचनसंस्कृतीत काय बदल पाहायला मिळू शकतात? ऑडिओ पब्लिशिंग इंडस्ट्री याकडे कसे पाहते आहे याचा वेध घेण्यासाठी संतोष देशपांडे यांनी बोलतं केलं आहे, स्टोरीसाइड इंडिया या पब्लिशिंग आणि स्टोरीटेल इंडियाचे भारताचे प्रमुख योगेश दशरथ यांना. यातून खूप रंजक अशी उलगड होते आहे आणि येणाऱ्या काळात वाचनसंस्कृती कशी बदलणार आहे, याचा अंदाजही होतो. पुस्तकांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने ऐकायलाच हवा, असा हा संवाद.
E397 · 17 Sep 2026 · 33 min
आपल्या देशात विशेषतः महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात सण-उत्सवांचे अतिशय महत्त्व आहे. मात्र, रुढी-परंपरांच्या चाकोरीत आपले सण-उत्सव अडकत चालल्याने आज त्यांची परिणामकारकता बदलते आहे, असा एक प्रवाह समाजात आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, याच विषयाला स्पर्श करीत संस्कृत भाषा व धर्मशास्त्राचे अभ्यासक वासुदेव डोंगरे यांना संतोष देशपांडे यांनी बोलते केले. मुळात सण आणि उत्सव यांतील फरक काय, रुढी व परंपरा यांकडे धर्मशास्त्र कसे पाहते आणि त्यातून कालचे उत्सव आज कालबाह्य होत आहेत का अशा थेट प्रश्नांचा वेध घेणारा हा विचारप्रवर्तक संवाद जरुर ऐका.
E396 · 11 Jul 2026 · 32 min
शाळेतील मुलांमध्ये वाचनाचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि ही पालकांपुढची नवी समस्या आहे. ग्रामीण भागात तर त्यासाठी पूरक वातावरणही नसते. वाचन कमी होण्यामागे अनेक कारणे असली तरी त्यात समाज म्हणून आपण काही करण्याची गरज आहे, हे ओळखून पुण्यातील बालक-पालक फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून गेली काही वर्षांपासून ग्रामीण भागातील मुलांसाठी `वाचन साखळी` संकल्पना रुजते आहे. या संकल्पनेचे प्रणेते विनायक जोशी यांना याच बाबत बोलतं केलं आहे, संतोष देशपांडे यांनी. ही संकल्पना नेमकी काय आहे, त्यातून मुलांचं पुस्तकांशी नातं कसं जोडलं जातं, कोणती पुस्तक त्यांना वाचायला मिळतात, त्यांचा प्रतिसाद कसा असतो अशा अनेक…
E388 · 5 Feb 2026 · 30 min
चांगल्या आरोग्यासाठी चांगला आहार आवश्यकच. मात्र प्रत्येकाच्या गरजेनुसार त्याचा डायट प्लॅन असायला हवा, असे आहारशास्त्र सांगते. मग, फास्ट फूडची सवय असणाऱ्यांनी काय करावे, आयुर्वेदिक मार्गाने जावे की आधुनिक असे अनेक प्रश्न प्रत्येकाच्या मनात डोकावतात. त्यातही ज्यांना काही आजार असेल त्यांच्यासाठी क्लिनिकल न्यूट्रिशन्स कसे मदत करते, त्यांच्यासाठी डायट प्लॅन करताना काय केलं जातं अशा अनेक बाबींची उलगड क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट निशा गोडबोले-पुजारी यांनी केली आहे, संतोष देशपांडे यांसमवेतच्या या खास आरोग्य संवादातून.
E387 · 27 Jan 2026 · 3 min
साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार लाभलेले लेखक प्रणव सखदेव यांची नवी साहित्यकृती- वीर योद्धा अर्जुन, नुकतीच पुणे पुस्तक महोत्सवातून रसिकांपुढे आली. त्याविषयी प्रणव सखदेव यांच्याशी साधलेला हा छोटेखानी संवाद.
Every episode of स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum →