Skip to content
Melo Podcasts Home
CategoriesLanguagesFollowing

Episode 388 · स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum

डायट प्लॅन करताना...

5 Feb 2026 · 29 min

Play episode WhatsApp Download

Episode notes

चांगल्या आरोग्यासाठी चांगला आहार आवश्यकच. मात्र प्रत्येकाच्या गरजेनुसार त्याचा डायट प्लॅन असायला हवा, असे आहारशास्त्र सांगते. मग, फास्ट फूडची सवय असणाऱ्यांनी काय करावे, आयुर्वेदिक मार्गाने जावे की आधुनिक असे अनेक प्रश्न प्रत्येकाच्या मनात डोकावतात. त्यातही ज्यांना काही आजार असेल त्यांच्यासाठी क्लिनिकल न्यूट्रिशन्स कसे मदत करते, त्यांच्यासाठी डायट प्लॅन करताना काय केलं जातं अशा अनेक बाबींची उलगड क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट निशा गोडबोले-पुजारी यांनी केली आहे, संतोष देशपांडे यांसमवेतच्या या खास आरोग्य संवादातून.

Podcast

स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum

Santosh Deshpande · Arts & Books · Marathi

A Marathi podcast about Audiobooks and books. Where every once in a while, we will be talking about everything that is Audiobooks. It will feature author interviews, voice artist interviews, book lovers and more. The podcast is powered by Storytel. स्टोरीटेल कट्टा आहे एक आगळं-वेगळं गप्पांचं ठिकाण. इथं रंगतात गप्पा पुस्तकांविषयी, ऑडिओबुक्स विषयी. इथं उलगडतं लेखक-कलाकारांचं अंतरंग...त्यांचं…

More from स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum All episodes →

  1. E393 · 10 Jun 2026 · 20 min

    IT vs AI: करिअर संपणार की बदलणार?

    कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच `एआय` अनेक क्षेत्रांमध्ये वेगाने बदल घडवते आहे. माहिती तंत्रज्ञान म्हणजेच आयटी क्षेत्रावर त्याचा सर्वात मोठा प्रभाव पडत असल्याचे चित्र आहे. त्यातून कित्येकांच्या नोकऱ्या जात आहेत, या क्षेत्रातील कंपन्यांमध्ये भरतीप्रक्रियाही मंदावली आहे. अशा परिस्थितीत, ज्यांनी आयटी मध्ये शिक्षण घेऊन आपले करिअर करायचे असे ठरविले आहे, अशांनी, विशेषतः विद्यार्थ्यांनी नेमके काय करावे याचा वेध घेण्यासाठी संतोष देशपांडे यांनी आयटी उद्योजक मनोज देशमुख यांना बोलते केले. एकूणच सध्या परिस्थिती काय आहे आणि त्यातून आपण काय शिकायला हवे याची उलगड या संवादातून होते. आयटी क्षेत्राचे आकर्षण…

  2. E392 · 7 Apr 2026 · 41 min

    पूर्वीचं पुणे का राहिलं नाही?

    महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून अभिमानाने नाव घेतलं जातं ते पुणे गेल्या काही दशकांमध्ये झपाट्याने विस्तारले आहे. हे होत असताना येथील नागरी सुविधांचा विकास कायमच चर्चेत राहिलेला आहे. नगर नियोजनातील तज्ज्ञ अनिरुद्ध पावसकर यांनी पुणे महापालिकेचे शहर अभियंता म्हणून नुकतीच सूत्रे हाती घेतली आहेत. त्यांना याच विषयावर बोलतं केले आहे संतोष देशपांडे यांनी. पुण्याच्या विकासाची दिशा नक्की कशी आहे, गती कुठे मंदावली आहे, येथील नगर नियोजनातील अडचणी कोणत्या, त्यावर काय मार्ग काढला जात आहे इथपासून ते शहर अभियंता म्हणून आपले प्राधान्य कशाला असेल इथपर्यंत अनेक बाबींची उलगड अनिरुद्ध पावसकरांनी या थेट…

  3. E391 · 21 Mar 2026 · 27 min

    तेलभूमीत नेमकं काय घडतं?

    इराण आणि अमेरिका-इस्त्रायलमध्ये युद्ध सुरु झाले आणि त्याच्या ज्वाला संपूर्ण आखाती देशांत धगधगत आहेत. हॉर्म्युझची सामुद्रधुनीत तणाव निर्माण झाल्याने जगभरातील तेल व गॅसच्या वितरणावर गंभीर परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर, आखाती देशांमध्ये असणाऱ्या तेलविहिरी, तेथील तेल काढण्याची प्रक्रिया, त्यातील तंत्रज्ञान अशा अनेक बाबींचे कुतुहल सर्वांना आहे. अस्सल पुणेकर असणारे शौनक गाडगीळ हे पेट्रोकेमिकल तंत्रज्ञ गेली अनेक वर्षे प्रत्यक्ष तेलविहिरींवर काम करतात. त्यांच्याशी संतोष देशपांडे यांनी साधलेल्या या संवादातून सर्वसामान्य जनांना आजवर अज्ञात अशा अनेक गोष्टी सहजपणे उलगडतात. जगाच्या भवितव्याची दिशा…

  4. E390 · 13 Mar 2026 · 25 min

    हेरगिरी... पुस्तकांत रंजक पण प्रत्यक्षात?

    आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रत्येक देशाचे हेर कार्यरत असतात. त्यांच्या थरारक कथा चित्रपट, वेबसिरीज किंवा पुस्तकांच्या माध्यामातून आपल्यापर्यंत पोहोचतात, खिळवून ठेवतात. प्रत्यक्षात हेरगिरी अशीच होत असते का? त्यातून युद्धाचे डाव खेळले जातात का? असे प्रश्न मग सर्वसामान्य रसिकांना पडतात. अशीच एक थरारक हेरकथा storytel वर दाखल झाली आहे- समीर चक्रवर्ती ऑपरेशन बलुचिस्तान! तिचे लेखक आहेत प्रसिद्ध लेखक संजय सोनवणी, ज्यांनी स्वतः खासगी गुप्तहेर म्हणून काम केले आहे. सध्या आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर खुद्द संजय सोनवणी यांच्याशी संतोष देशपांडे यांनी साधलेल्या या संवादातून अनेक रंजक…

  5. E389 · 12 Feb 2026 · 19 min

    ऑडिओबुक्स आता मुख्य प्रवाहात...

    वाचनाचे प्रमाण कमी होते आहे, ही परिस्थिती आपल्याकडेच नव्हे तर जगभरात आहे. जगात नवी पिढी ऑडिओबुक्सकडे का वळते आहे? भारतात काय परिस्थिती आहे? 2026 मध्ये वाचनसंस्कृतीत काय बदल पाहायला मिळू शकतात? ऑडिओ पब्लिशिंग इंडस्ट्री याकडे कसे पाहते आहे याचा वेध घेण्यासाठी संतोष देशपांडे यांनी बोलतं केलं आहे, स्टोरीसाइड इंडिया या पब्लिशिंग आणि स्टोरीटेल इंडियाचे भारताचे प्रमुख योगेश दशरथ यांना. यातून खूप रंजक अशी उलगड होते आहे आणि येणाऱ्या काळात वाचनसंस्कृती कशी बदलणार आहे, याचा अंदाजही होतो. पुस्तकांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने ऐकायलाच हवा, असा हा संवाद.

  6. E387 · 27 Jan 2026 · 3 min

    अर्जुनाविषयी का लिहावसे वाटले?

    साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार लाभलेले लेखक प्रणव सखदेव यांची नवी साहित्यकृती- वीर योद्धा अर्जुन, नुकतीच पुणे पुस्तक महोत्सवातून रसिकांपुढे आली. त्याविषयी प्रणव सखदेव यांच्याशी साधलेला हा छोटेखानी संवाद.

  7. E386 · 16 Jan 2026 · 22 min

    `पूर्णवादा`ची जागतिक दखल

    महाराष्ट्राच्या पावन भूमीत डॉ. पारनेरकर महाराजांच्या संकल्पनेतून साकारलेल्या पूर्णवाद तत्त्वज्ञानाची ओळख आता जगभरात होते आहे. आंतरराष्ट्रीय प्रकाशन संस्था 'हार्पर काॅलिन्स' प्रकाशित Know Thy Roots सारख्या ग्रंथाच्या माध्यमातून नांदेड येथील डॉ. टी.पी. देशपांडे सरांनी पूर्णवाद आंतरराष्ट्रीय पटलावर आणला. नुकत्याच झालेल्या भारतीय तत्त्वज्ञान परिषदेत त्यावर विशेष व्याख्यान दिले. या पार्श्‍वभूमीवर, पूर्णवाद म्हणजे नेमके काय, त्याचे महत्व काय, Know Thy Roots मध्ये काय आहे याविषयी डॉ.टी.पी. देशपांडे यांच्याशी साधलेला हा संवाद भारतीय तत्त्वज्ञानामध्ये रुची असणार्‍या प्रत्येकाने ऐकायलाच हवा!

  8. E385 · 22 Dec 2025 · 29 min

    'स्पेलिंग' बदलून नशीब बदलते?

    Numerology म्हणजेच अंकशास्त्र याचा आपल्या नावाच्या 'स्पेलिंग'शी काय संबंध आहे? आपल्या नावाचे स्पेलिंग बदलून आपले भवितव्य बदलता येते का? असेल तर कसे? या विषयी पुण्यातील प्रसिद्ध Numerology अभ्यासक नीलेश पैठणकर यांच्याशी संतोष देशपांडे यांनी साधलेला हा एकदम 'हटके' संवाद! हा संवाद युट्यूबवर पाहण्यासाठी पुढील लिंक क्लिक करा- https://youtu.be/Ldek3dxkhDE

  9. E384 · 15 Dec 2025 · 25 min

    उद्याची 'फॉरेन लँग्वेज' कोणती?

    परकीय भाषा शिकणे केव्हाही उपयुक्त असते, असे आपण ऐकतो. मात्र, आजच्या परिस्थितीत नेमक्या कोणत्या परकीय भाषा शिकायला हव्यात, कोणत्या भाषांना चांगले भवितव्य आहे याविषयी अनेकांच्या मनात उत्सुकता आहे. परकीय भाषातज्ज्ञ अदिती विशाल यांच्याशी याच विषयावर संतोष देशपांडे यांनी संवाद साधला. यातून परकीय भाषा का शिवावी इथपासून कोणती भाषा शिकणे सोपे आहे, कठीण आहे आणि कोणत्या भाषांना नजिकच्या काळात भवितव्य आहे इथपर्यंत अनेक बाबींची सहज आणि सोप्या शब्दांत उलगड होते. परकीय भाषांविषयी कुतुहल असलेल्या प्रत्येकाने ऐकायलाच हवा, असा हा स्टोरीटेल कट्टा स्पेशल पॉडकास्ट. हा एपिसोड युट्यूबवर पाहण्यासाठी पुढील लिंकवर…

  10. E383 · 25 Nov 2025 · 49 min

    `हिंदुस्तानी अभिजात संगीताचा इतिहास` उलगडताना...

    शास्त्रीय संगीताची समृद्ध परंपरा ही भारतीय संस्कृतीची महत्त्वाची ओळख. ही परंपरा काळाच्या ओघात समृद्ध होत गेली. गेल्या सात शतकांचा वेध घेत त्यातील महत्त्वाच्या नोंदी आपल्यापुढे आल्या आहेत 'हिंदुस्तानी अभिजात संगीताचा इतिहास' या संशोधनसिद्ध ग्रंथातून. प्रसिद्ध गायिका, संगीताच्या अभ्यासक विदुषी अंजली मालकर यांनी आपल्या प्रदीर्घ संशोधनातून हा इतिहास अत्यंत रंजक पद्धतीने पुढे आणला आहे. मराठी भाषेत कदाचित असा हा पहिलाच आणि एकमेव असा अनमोल दस्तऐवज ठरवा. अशा या प्रकल्पाविषयी, तो साकारताना गवसलेल्या आजवर अज्ञात अशा पैलूंविषयी जाणून घेऊया, दस्तुरखुद्द अंजली मालकर यांसमवेतच्या या संवादातून.

Take it with you

The Melo app keeps playing with the screen off, works in the car and on your watch, wakes you to your station, and browses the whole catalogue offline. Free, no ads, no account.

Get it on Google Play